कधीकधी 'मीच' माझा जोडीदार बनतो.
'मीच' माझा एकटेपणा दूर करू पाहतो
आरशात स्वतःला पाहून 'मीच'
माझ्या रुपाची प्रशंसा करतो
त्यावेळीही 'मीच' माझ्यावर खुश होत असतो
आनंदाची बातमी 'मीच' मला धावत येऊन देतो
निराश होताच 'मीच' माझे सांत्वन करू पाहतो
फिरायला जायला 'मीच' माझ्या बरोबर