1. [New post] तेजीचा वारू चौखुर
1 message
Rapet Bajarachi <comment-reply@wordpress.com> Sun, 16 Jul, 2023 at 19:22
Reply to: Rapet Bajarachi
<comment+rf55whg7t3ss2fwbjtmu2bf@comment.wordpress.com>
To: smv2004@gmail.com
Rapet Bajarachi
तेजीचा वारू चौखुर
Sudhir Joshi
Jul 16
परदेशी गुंतवणुकदारांच्या सातत्यपूर्ण खरेदीने बाजाराने गेल्या तीन
सप्ताहात नवनवे वरचे टप्पे गाठले. भारताची अर्थव्यवस्था सध्या
स्थिरपणे वाटचाल करीत आहे व जरी इतर देशांपुढे आर्थिक
आव्हाने असली तरी नजीकच्या भविष्यात भारतीय अर्थव्यवस्था
चांगली कामगिरी करण्याचे भाकीत अनेक देशी व विदेशी वित्तीय
संस्था करीत आहेत. गेल्या सप्ताहात जाहीर झालेले महागाईचे व
औद्योगिक उत्पादनाचे आकडे हेच अधोरेखित करतात.
अमेरिके तील महागाईचा दरही आटोक्यात येण्याची लक्षणे आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या कं पनीचे
2. समभाग आपल्या भागधारकांना देण्याची तारीख (रेकॉर्ड डेट २०
जूलै) जाहीर के ल्यामुळे रिलायन्सच्या समभागात मोठी खरेदी
झाली. त्याच बरोबर एचडीएफसी च्या समभागांच्या बदल्यात
एचडीएफसी बँके चे समभाग मिळण्याची तारीख जवळ आल्यामुळे
त्या दोन्ही समभागात तेजी होती. टीसीएसचे निकाल अपेक्षेपेक्षा
चांगले आले व कं पनीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या भविष्यातील
प्रगती बाबत आशादायक भाकीते के ली. बाजाराने त्याची नोंद
घेतली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या क्षेत्राचा निर्देशांक ४.७ टक्क्यांनी
वर गेला. अशी अनेक कारणे व परदेशी वित्तीय संस्थांचही खरेदी
यामुळे प्रमुख निर्देशांकानी नवा उच्चांक गाठला (सेन्सेक्स ६६०६०
निफ्टी १९५६४ व बँक निफ्टी ४४८१९).
सिमेन्स: भारतातील इंजिनिअरिंग, उर्जा व्यवस्थापन, आरोग्याशी
निगडित तंत्रज्ञान, ऑटोमेशन व कं ट्रोल, रेल्वे सिग्नलिंग व सुरक्षा
प्रणाली अशा अनेक उच्च तांत्रिक सेवा देणारी ही कं पनी आहे. मूळ
जर्मन कं पनीचा ७५ टक्के हिस्सा या कं पनीत असून लाहन
गुंतवणूकदारांकडे के वळ १० टक्के भांडवल आहे. कं पनीने
नुकताच आपला कमी दाबावर चालणाऱ्या मोटर्सचा व्यवसाय
२२०० कोटी रूपयांना विकला. त्यामधील नफा भागधारकांना
विशेष डिव्हिडंड रुपाने मिळणार आहे. कं पनीने नुकताच रेल्वेचे डबे
तयार करण्यासाठी कारखाना सुरू के ला आहे. त्यामधून
भारतातील व परदेशातील मागणीचा पुरवठा कं पनी करणार आहे.
वाढत्या सरकारी व खासगी भांडवली गुंतवणूकीमधील संधींचा
लाभ सिमेंन्सला मिळेल. कं पनीला रेल्वेचा विस्तार तसेच सिग्नलिंग
सिस्टिम मधील सुधारणा यामधे शंधी आहेत. ३६००-३७०० च्या
3. पट्ट्यात या समभागांमधे गुंतवणूक करता येईल. तसेच थोड्या
घसरणीतही गुंतवणूक वाढवता येईल.
पर्सिसटंट: कं पनीने आपले उत्पन्न पुढील चार वर्षात दुप्पट (१६
हजार कोटी) करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. कं पनीने २०२२ व २३ या
वर्षात अनुक्रमे ३३ व ३५ टक्के वाढ साध्य के ली होती. माहिती
तंत्रज्ञान क्षेत्रातील या मिडकॅ प कं पनीने नेहमीच बाजारात चांगली
कामगिरी के ली आहे. पण या क्षेत्रातील सध्याच्या दबावाला ती
अपवाद ठरू शकत नाही. बँकिंग, विमा व आर्थिक सेवा,
आरोग्यनिगा व उच्च तांत्रिक सेवा अशा तीन क्षेत्रात ही कं पनी
आपला सॉफ्टवेअर सेवा प्रदान करते. कं पनी कडे प्रत्येक वर्षी
ऑर्डर्सचा बॅकलॉग वाढतच आहे. त्यामुळे पुढील काही वर्षाच्या
कामगिरी बाबत खात्री बाळगता येते. गेल्या सप्ताहात वाढून ४९००
झालेला हा समभाग थोडी नरमाई आली की खरेदी करण्यासारखा
आहे.
स्पेशालिटी के मिकल्स: स्पेशालिटी के मिकल्स कं पन्या सध्या
कठीण काळातून जात आहेत. चीनची देशांतर्गत मागणी कमी
झाल्यामुळे चीनने निर्यात वाढविली आहे. खनिज तेलाच्या किंमती
कमी झाल्यामुळे देखील के मिकल्सच्या किंमती कमी झाल्या
आहेत. त्याचा फटका भारतीय के मिकल्स कं पन्यांना बसतो आहे.
जगातील के मिकल्सच्या मागणीचा १८ टक्के वाटा चीन मधून
पुरविला जातो. भारताचा निर्यातीचा वाटा के वळ ४ टक्के आहे.
करोना काळानंतर मात्र चीनला पर्याय म्हणून भारताकडे जगाची
नजर गेली आहे. भारतामधील कमी उत्पादन खर्च, सरकारची
उत्पादन निगडीत प्रोत्साहन (पीएलआय) योजना, निर्यातीसाठी
4. Comment Like
बंदरांची सोय, कच्च्या मालाची उपलब्धता, सुशिक्षित तंत्रज्ञ अशा
बाबींमुळे अनेक कं पन्यांनी उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रकल्प
हाती घेतले आहेत. याशिवाय कं त्राटी उत्पादनांवर देखील कं पन्यांनी
भर दिला आहे. जगाच्या तुलनेत भारतात के मिकल्सचा दरडोई
वापर अजून खूप कमी आहे. या उत्पादनांना रंग, रसायने,
इलेक्ट्रॉनिक्स, तयार अन्न पदार्थ, सौंदर्य प्रसाधने, बॅटरी, साबण
अशा विविध उत्पादन क्षेत्रातून मागणी असते. या परिस्थितीमधे
बाजाराच्या विरूध्द जाऊन धाडसी खरेदीसाठी विनती ऑरगॅनिक्स,
अतुल लिमिटेड, गुजरात फ्ल्युरोके मिकल्स, फाईन ऑरगॅनिक्स
अशा कं पन्यांमधे के लेली खरेदी पुढील दोन वर्षात चांगली मिळकत
करून देईल.
या सप्ताहात आणखी काही दिग्गज कं पन्या (इन्फोसिस व माहिती
तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर मिडकॅ प कं पन्या, रिलायन्स, हिंदुस्तान
युनिलिव्हर, एचडीएफसी बँक) आपले निकाल जाहीर करतील.
त्याचा अंदाज घेऊन बाजार थोडी विश्रांती घेईल.
You can also reply to this email to leave a comment.
Unsubscribe to no longer receive posts from Rapet
Bajarachi.
Change your email settings at manage subscriptions.
Trouble clicking? Copy and paste this URL into your
browser: